पुण्यात राज ठाकरे यांची मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी बॅटिंग

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. माझे अजित पवार यांच्याशी मतभेद आहेत, असतीलही परंतु त्यांनी जातीपातीचे राजकारण केल्याचे मी कधी पाहिले नाही, असे राज म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीचा बिनशर्त पाठिंबा जाहीर … Read more

Published On: 

Raj Thackeray announced two candidates for assembly elections

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. माझे अजित पवार यांच्याशी मतभेद आहेत, असतीलही परंतु त्यांनी जातीपातीचे राजकारण केल्याचे मी कधी पाहिले नाही, असे राज म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीचा बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. सारसबागेसमोर त्यांची मोठी सभा पार पडली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. सारसबागेसमोरील रस्त्यावर त्यांची मोठी सभा पार पडली. त्यांना ऐकण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही देखील हजर होते. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करताना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले.

अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही
शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केली आणि महाराष्ट्रात तेव्हापासूनच जातीयवादाला सुरूवात झाली, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला. त्याचवेळी शरद पवार यांच्यासोबत राहूनही अजित पवार यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही, असे प्रमाणपत्र राज यांनी अजितदादांना दिले.ाज

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही