Sandeep Deshpande | “मज्जा आहे बाबा एका माणसाची आता पंतप्रधान..”; संदीप देशपांडेंच्या ठाकरेंना खोचक शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sandeep Deshpande | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे’, असं वक्तव्य केलं आहे. संजय राऊतांच्या याच वक्तव्यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sandeep Deshpande’s twit

“भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना  मानो होली है” आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची”, असे संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

संजय राऊत नक्की काय म्हणाले?

“राजकारणात काहीही घडू शकतं. “पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू…आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात”, असे संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-