🕒 1 min read
बंगळुरू | आयपीएल 2025 चा थरार ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पुन्हा सुरू होताच चाहत्यांना एक धक्का बसण्याची शक्यता आहे. 17 मे रोजी होणारा RCB VS KKR यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून, संध्याकाळपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जर सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतील. यामुळे कोलकाता नाईट रायडर्सची प्लेऑफ शर्यत धोक्यात येऊ शकते, कारण त्यांच्या फक्त 12 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. सध्याच्या गुणतालिकेनुसार, टॉप 4 संघांनी 14 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत.
RCB vs KKR Match May Be Cancelled Due to Rain
दुसरीकडे, बंगळुरूला एक गुण मिळाल्यास ते 17 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचतील, त्यामुळे त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित होईल. बंगळुरू आणि कर्नाटकात काही ठिकाणी वादळासह गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, सामना रद्द होण्याची शक्यता अधिक आहे. सामना वाचवण्यासाठी षटकांची मर्यादा कमी करून खेळवण्याचा पर्यायही BCCI विचारात घेऊ शकते.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टातच अभिनेत्री निम्रतच्या पार्श्वभागाला स्पर्श; कोर्टरूममध्ये १९व्या वर्षी अनुभव
- शिंदे गटाच्या आमदाराकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण? जीवे मारण्याची धमकी
- भाजपचं जहाज ओव्हरलोड झालंय, बुडणार तेच – उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now