Raosaheb Danve | काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान या प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत रावसाहेब दानवे यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सुनावलं आहे. “ते आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत का? राजीनामा मागायला,” असा सवालही दानवेंनी राऊतांना केला.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सांभाळावं नाहीतर ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावू शकतात, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. त्यांच्यामुळेच पक्षाची वाताहात झाली असून, त्यांच्यामुळेच युती तुटल्याचे म्हणत दानवेंनी राऊतांवर निशाणा साधला आहे .
महत्वाच्या बातम्या :