Share

Ramdas Athawale | भाजप-शिवसेना जागावाटपाच्या वादावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

🕒 1 min read Ramdas Athawale | नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ramdas Athawale | नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित केल्याने या मुद्द्यावरुन वाद चांगलाच पेटणार आहे. आता प्रश्नावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी दोघांची समजूत काढण्याचे ठरवले आहे. रामदास आठवले आज नाशिक दौऱ्यावर असताना बोलत होते.

Ramdas Athawale talk about BJP-Shivsena seat shearing 

“भाजपने मत व्यक्त केलंय मात्र आरपीआय, शिवसेना आणि भाजप सोबत राहिली तरच फायदा आहे. बावनकुळेंच्या 50 जागांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असतील तर मी मध्यस्थी करून नाराजी दूर करेन. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही कायम राहणार आहेत”, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

“एक मंत्रीपद आणि एक एमएलसी मिळावी अशी आमची अपेक्षा असून लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने तीन जागा द्याव्यात, यात एक शिर्डी आणि एक मुंबई आणि एक इतर जागा मिळावी” अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही