Share

मराठयांना आरक्षण मिळूच शकत नाही; जरांगेंची मागणी आहे ना? मग कशी करायची हे पण सांगा – राज ठाकरे

Raj Thackeray | मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले होते.

मेळाव्यात राज यांनी मराठा आरक्षण संदर्भात मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘मराठयांना आरक्षण मिळूच शकत नाही; मनोज जरांगेंची मागणी आहे ना? मग मागणी कशी पूर्ण करायची हे पण सांगा. शरद पवारांपासून सर्व नेत्याना माहित आहे. हे आरक्षण मिळू शकत नाही.

Eknath Shinde यांचा ‘पुष्पा’ असा उल्लेख करत त्यांच्यावर ही ठाकरेंनी टीका केली, राज म्हणाले, ”एकनाथ शिंदे यांनी सांगितले आमच्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळाले, अरे देऊच शकत नाही, बाबा. एकनाथ शिंदे यांच्या हातात ती पॉवरच नाही, राज्य सरकार ती घोषणाच करू शकत नाही.” असे म्हणत शिंदे यांना ठाकरेंनी कानपिचक्या दिल्या.

Raj Thackeray Comment on Maratha reservation And Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या

Raj Thackeray Comment on Maratha reservation And Manoj Jarange । मेळाव्यात राज यांनी मराठा आरक्षण संदर्भात मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘मराठयांना आरक्षण मिळूच शकत नाही;

India Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now