Share

Dhananjay Munde चा शपथविधीच होयला नको होता, राजीनाम्याचे पंकजा मुंडेंकडून स्वागत

Pankaja Munde statement about Dhananjay Munde resignation

बीड – धनंजय मुंडे ( Dhananjay Munde Resignation ) यांच्या राजीनाम्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी स्वागत केले असून, हा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता, असे ठाम मत व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांचा शपथविधीच होयला नको होता. सरकारने उशिरा का होईना योग्य निर्णय घेतला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. मात्र, या राजीनाम्यामागे खरे कारण काय? हा राजीनामा उशिराने का घेतला गेला?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

केज कोर्टात सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे (Santosh Deshmukh murder case) दोषारोप पत्र सादर केले आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अखेर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी, या निर्णयासाठी एवढा उशीर का झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा समोर आले असून, या वक्तव्यामुळे बीडच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावरच टीका केली आहे. “पंकजा मुंडे इंटरनॅशनल कॅटेगरीत गेल्या असून त्यांना बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारू नका. त्यांना आता गाझा पट्टी, डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन आणि पुतीनबद्दल विचारा,” असा सल्ला सुरेश धस यांनी दिला आहे. यावरून बीडच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे नाही, अन्य कारणांमुळे राजीनामा दिला”- Dhananjay Munde

मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील ( Santosh Deshmukh murder case ) आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी ठाम मागणी आहे, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच, माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या

बीड – धनंजय मुंडे ( Dhananjay Munde Resignation ) यांच्या राजीनाम्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी …

पुढे वाचा

Mumbai Crime Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now