Rohit Pawar । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो तसेच व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून आता संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच फोटो आणि व्हिडिओवरून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे.
“फोटो आणि व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. काल हे फोटो आपल्याकडे आले आहेत. पण दोन महिन्यांपूर्वीच हे फोटो, व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis0 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सुद्धा आले असावेत. महायुतीमधील वरिष्ठांना माहिती असताना सुद्धा त्यांनी धाडसी निर्णय घेतला नाही,” असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरूनही फडणवीसांवर टीका केली. “मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे काही पॉवर नाही का? धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. वाल्मिक कराड (Walmik Karad) हा त्यांच्या खूप जवळचा माणूस आहे. त्यांचे अनेक व्यवहार एकत्र आहेत. कपडे सुद्धा एकमेकांचे घालत असतील,” असा दावा पवार यांनी केला.
“आज जर थोरले मुंडे असते, तर त्यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) चाबकाने मारले असते. दोन महिन्यांपासून हे फोटो सरकारकडे असताना ही ज्या पद्धतीने सरकार वागत आहे, त्यावरून तुम्ही आरोपी आणि धनंजय मुंडेंची पाठराखण करत असे दिसत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
Rohit Pawar on Walmik Karad
पुढे रोहित पवार म्हणाले की, “वाल्मिक कराड हा राक्षसी माणूस आहे. महायुती सरकारला मन आहे की नाही?” असा संतप्त सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या टीकेमुळे राजकीय वातावरण पेटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :