Dhananjay Munde । मागील अडीच महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला आहे.
यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाची भूमिका लवकरच पक्षाचे अध्यक्ष जाहीर करतील. आम्ही कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही, अशी पहिल्यापासून पक्षाची भूमिका होती. आमची न्यायाची भूमिका राहील,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. तसेच धनंजय मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. काल राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला होता. यावर आता धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
Chhagan Bhujbal first reaction on Dhananjay Munde resignation
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून आता पुन्हा एकदा विरोधक सरकारची कोंडी करताना दिसत आहे. विरोधक आता सरकार बरखास्त करावे अशी मागणी लावून धरत आहे. यामुळे हे प्रकरण आणखी पेटू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :