मुंबई ( Ajit Pawar ) – संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड ( Walmik Karad ) वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर मोठे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला का? या प्रश्नावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी पत्रकारांवरच चिडचिड करत, “तुम्हाला काही माहिती नाही, विधानभवनात बोलेल!” असे उत्तर दिले.
धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी वाढत असताना, सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. दोन महिने उलटूनही सगळ्या आरोपींना अटक का होत नाही? असा सवाल विरोधक आणि संतोष देशमुख यांचे समर्थक करत आहेत.
दरम्यान, अजित पवार गट या प्रकरणावर अडचणीत आला असून, धनंजय मुंडे यांचे भवितव्य काय राहील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विधानभवनात अजित पवार काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Dhananjay Munde Resign – Devendra Fadnavis
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडे सुपूर्त केला आहे. फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला असून, पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या राजीनाम्यानंतर अजित पवार गट अडचणीत आला आहे, तसेच विरोधकांनी आता सरकारवर आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढील तपासात कठोर कारवाई करणार का? आणि धनंजय मुंडेंच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले