🕒 1 min read
Manoj Jarange । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो (Santosh Deshmukh murder photo) समोर आल्यानंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी धनंजय देशमुखांची (Dhananjay Deshmukh) भेट घेतली.
यावेळी जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. “केवळ राजीनामा घेऊन काही होणार नाही. मुंडेवर 302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका. नाटकबाजी करायला नको. जनता काही करु शकते. अन्यायाचा बीमोड करतो. पठ्ठया कोणाला सोडीत नाही,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
“आरोपींनी संतोष अण्णाला (Santosh Deshmukh) कपडे काढून मारले. त्याचे फोटो पाहून काळीज हेलावून जात आहे. इतकी क्रूरता करण्याचं धाडस कसे झाले? आता तरी अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लाथ मारून बाहेर काढावे,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “आरोपी जेलमध्ये असले किंवा ते जेलमधून बाहेर पडले तरी संतोष भैय्या तुमचा बदला होणार. मी टोकाच बोलतोय. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे. यांना पैसा, पद एवढच लागतं, कोणत्याही टोकाला जातील,” असे जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh murder viral photo
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निवेदन जारी करत कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde यांना दिले फडणवीसांनी राजीनामा देण्याचे आदेश? महत्त्वाची माहिती आली समोर
- “आरोपींना गोळ्या घालून मारलं तरच…”; Dhananjay Deshmukh यांची मोठी मागणी
- “मुंडेंवर आरोप होऊनही मुख्यमंत्री शांत का?”; Supriya Sule यांचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










