Suresh Dhas । केज कोर्टात सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे (Santosh Deshmukh murder case) दोषारोप पत्र सादर केले आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
याच कारणास्तव विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे. राजीनामा देताच बीडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.
यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावरच टीका केली आहे. “पंकजा मुंडे इंटरनॅशनल कॅटेगरीत गेल्या असून त्यांना बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारू नका. त्यांना आता गाझा पट्टी, डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन आणि पुतीनबद्दल विचारा,” असा सल्ला सुरेश धस यांनी दिला आहे.
“संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आले तरी पंकजा मुंडे यांनी देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. किमान आता तरी पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घ्यावी,” अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
Suresh Dhas on Pankaja Munde
दरम्यान, सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून पंकजा मुंडे यांना खडे बोल सुनावले आहे. सुरेश धस यांच्या टीकेनंतर आता पंकजा मुंडे त्यांना काय उत्तर देतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :