बीड – मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील ( Santosh Deshmukh murder case ) आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी ठाम मागणी आहे, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच, माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
Dhananjay Munde resigned not because of the Santosh Deshmukh murder case
काल समोर आलेल्या काही फोटोंमुळे मन व्यथित झाले असल्याचे सांगत, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मी सुरुवातीपासूनच आग्रही होतो, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या राजीनाम्यानंतर बीड आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सरकार या प्रकरणात पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या