Share

Nilesh Rane | “अशोक गेहलोत आणि उद्धव ठाकरे हे वेगळे नाहीत”; निलेश राणे असं का म्हणाले?

Nilesh Rane | मुंबई : राजस्थान सरकारसाठी लोकसभा सभागृहामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करताना मोठा घोळ घातला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केल्याने विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

“अशोक घेलोत आणि उद्धव ठाकरे हे वेगळे नाहीत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशाचं स्वातंत्र्य वर्ष विसरले आणि हे बजेट विसरले”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्याचबरोबर “ही मंडळी स्वतःला सांभाळू शकत नाही देश आणि राज्य काय सांभाळणार”, असा सवाल करत निलेश राणेंनी घणाघात केलाय.

मुख्यमंत्र्यांनी वाचला जुना अर्थसंकल्प (CM Ashok Gehlot read the old budget)

विधानसभेत विरोधी पक्षाकडून आक्रमक पहायला मिळाली. त्यानंतर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. असं सांगितलं जातंय की, “अशोक गेहलोत ज्यावेळी बजेट सादर करत होते, त्यावेळी त्यांनी मागील तीन ते चार योजनाही वाचल्या. यामध्ये नगरविकास आराखड्यातील गेल्यावर्षीच्या योजनांचाही समावेश होता. तेव्हा पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या कानात सांगितलं. त्यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरु केला.”, असंही सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Nilesh Rane | मुंबई : राजस्थान सरकारसाठी लोकसभा सभागृहामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics