Share

Eknath Shinde Vs NCP | देशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 व्या क्रमांकावर; राष्ट्रवादीच्या नेत्याची जहरी टीका

🕒 1 min read NCP | मुंबई : इंडिया टूडे-सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव समोर आले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना फक्त 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश … Read more

Published On: 

🕒 1 min read

NCP | मुंबई : इंडिया टूडे-सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव समोर आले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना फक्त 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.

या सर्व्हेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे–फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वैधतेचा निकाल जेव्हा लागेल, त्यावेळी इंडिया टुडेच्या सर्व्हेतून आलेला 34 खासदारांचा आकडा 40 च्या आसपास जाईल. तसेच उद्धव ठाकरेंच्या तुलनेत शिंदे कमी लोकप्रिय आहेत’, असा टोलाही तपासे यांनी लगावला आहे.

‘दूध का दूध पानी का पानी’

“उध्दव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडी सरकारमध्ये उजवी ठरली होती. त्यामुळेच पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे यांना स्थान मिळवता आले. मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना दहामध्येही स्थान मिळवता आले नाही. याचा अर्थ जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होत आहे. आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे–फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दबावतंत्राचे राजकारण करुन सरकार काबीज केले ते जनतेला रुचलेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल”, असेही महेश तपासे म्हणाले आहेत.

‘जनतेचा कौल शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावा’

“‘सी वोटरचा’ जो सर्व्हे आला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे. प्रकाश आंबेडकर हे उध्दव ठाकरे यांचे नवीन मित्र झाले आहेत. मात्र देशपातळीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांच्या मोर्चाचे शरद पवारसाहेब हे नेतृत्व करत आहेत. जातीयवादाच्या विरोधातील हा मोर्चा असून यामध्ये पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य भाजपविरोधात असेल”, अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांना तब्बल 39 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली असून लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर (7 टक्के पसंती), M. K. स्टॅलिन चौथ्या क्रमांकावर (5 टक्के पसंती), नवीन पटनायक पाचव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), हेमंत बिसवा सरमा सहाव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), शिवराज सिंह चौहान सातव्या क्रमाकांवर  असून त्यांना 2.4 टक्के लोकांची पसंती आहेत.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या