Share

Nana Patole | “फडणवीसांना सत्तेत आल्यावर वीजबिल माफीचा विसर”; नाना पटोलेंची खोचक टोला

🕒 1 min readNana Patole | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत नसताना वीज बील माफ करण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्याचाच दाखला देत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. नाना पटोले हे आज नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टीकेचे लक्ष्य केले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत नसताना वीज बील माफ करण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्याचाच दाखला देत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. नाना पटोले हे आज नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

“देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा मध्य प्रदेश सरकारची उदाहरणे देत शेतकऱ्यांचे वीजबिल मा‌फ करण्याची मागणी करीत होते. आता ते स्वत:च अर्थमंत्री आहे तर त्यांना वीजबिल माफीच्या मागणीचा विसर पडलेला आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

“फडणवीस विरोधी पक्षनेते असताना मध्य प्रदेश सरकारचे गुणगाण करीत होते. मध्य प्रदेश सरकारने शेकडो शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असे सवाल आवेशात विचारत होते. आता ते अर्थमंत्री असताना त्यांना सर्व गोष्टी स्मरत नाही. सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

“देशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त झाली आहे. मात्र,  भाजपचे केंद्र आणि राज्य सरकार काहीच करायला तयार नाही. राज्यात तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठाही केला नाही आणि पीक विमा देखील दिला जात नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या करीत आहेत”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!