Share

Anil Babar Shivsena | सेना आमदाराने पडळकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले, “कोणा एकाला…”

🕒 1 min read Shivsena | सांगली : काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यात मोही येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बारामतीमधील झालेल्या चर्चेचा संदर्भ देत 2024 चा आमदार भाजपचाच असेल असे जाहीर वक्तव्य करून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना एकप्रकारे घरी बसण्याचाच सल्ला दिला होता. यापुर्वीही गोपिचंद पडळकर यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Shivsena | सांगली : काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यात मोही येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बारामतीमधील झालेल्या चर्चेचा संदर्भ देत 2024 चा आमदार भाजपचाच असेल असे जाहीर वक्तव्य करून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना एकप्रकारे घरी बसण्याचाच सल्ला दिला होता. यापुर्वीही गोपिचंद पडळकर यांनी बाबर यांना मागील निवडणुकीत चूक केली, आता ही चूक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून सुधारली जाईल असे सांगितले होते. त्यावरुन आता अनिल बाबर यांनी पडळकरांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

“खानापूर आटपाडीचा पुढचा आमदार कोण असेल हे ठरविण्याचा अधिकार केवळ जनतेचाच आहे, कोणा एकाला पुढचा लोकप्रतिनिधी ठरविण्याचा ठेका जनतेने दिलेला नाही” असे म्हणत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना खडेबोल सुनावले आहेत.

आगामी निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढविण्याचे संकेत मिळत असताना खुद्द भाजपमधूनच आमदार बाबर यांना आव्हान देण्याचा प्रयत्न पडळकर यांच्याकडून सुरू आहेत. यावेळी आमदार . बाबर यांनी कुठे काय बोलायचे याचे संस्कार आपणावर आहेत असे सांगून पडळकर यांच्यावरील संस्कारावर प्रश्‍नचिन्हच उपस्थित केले होते.

खानापूर-आटपाडी मतदार संघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची लढत झाली होती. यावेळी आमदार बाबर यांनी मुलासह आमदार पडळकर यांची बारामतीच्या ‘विश्रामधाम’वर भेट घेउन आपली ही शेवटचीच निवडणूक असून यावेळी सहकार्यासाठी हात पुढे केला होता. बाबर यांनीच ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगितल्याने आगामी निवडणुीत आमदार बाबर हे उमेदवार असणार नाहीत असे सांगत एकप्रकारे आमदार बाबर यांनाच शह देण्याचा प्रयत्न आमदार पडळकर यांनी मोहीच्या जाहीर सभेत केला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही