Share

Eknath Shinde | “दिघे साहेबांची समाधी एकनाथ शिंदेंनी बांधली म्हणून..”; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काल ठाण्यामध्ये गेले होते. ठाण्यातील आरोग्य शिबीरात त्यांची उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी भाषणही केले. ‘माझ्यासोबत जे राहिले आहेत ते अस्सल कडवट शिवसैनिक बाकी विकाऊ विकले गेले’, असं म्हणत त्यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला. मात्र ‘आनंद आश्रम’ या ठिकाणी जाणे त्यांनी टाळले. यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, “काल इतक्या घाई घाईत मतांसाठी जैन मुनींना भेटायला गेले. दिघे साहेबांचे समाधीस्थळ मात्र लक्षात नाही राहिले. उद्धवजी, समाधी शिंदे साहेबांनी बांधली म्हणून तिथे तुमची पावले नाही वळली की बाळासाहेबांचे स्मारक अजून करू शकलो नाही, याची लाज वाटली?”

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या टेंभी नाका या ठिकाणी ‘आनंद आश्रम’ आहे. या आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. उद्धव ठाकरे ठाण्यात येणार होते त्याआधी आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक उभारण्यात आला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम या ठिकाणी जाणे टाळले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई : शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काल ठाण्यामध्ये गेले होते. ठाण्यातील आरोग्य शिबीरात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics