Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2024 लिलावापूर्वी आयपीएलने सर्व खेळाडूंसाठी ट्रेड विंडो सुरू केली आहे. या ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) आपला जुना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) पुन्हा एकदा संघात सामील करून घेतलं आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( Raj Thackeray ) राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून राज्यातील उद्योगधंदे गुजरातला जाताना दिसत आहे.
अशात गुजरात टायटन्सचा ( Gujarat Titans ) खेळाडू मुंबईमध्ये सामील झाला आहे. यावरून मनसेनं ( Raj Thackeray ) राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.
“महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी स्वाभिमान लिलावात काढला नसता तर राज्यातून उद्योग पळवता आले नसते आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्योगांचं ‘हार्दिक’ स्वागत करता आलं असतं.
सैन्याला पुरेपूर रसद पुरवली आणि चिवटपणे बाजू लावून धरली तर गमावलेल्या गोष्टी पुन्हा कमावता येतात फक्त इच्छाशक्ती हवी. असो !”, असं मनसेने ( Raj Thackeray ) ट्विट करत म्हटलं आहे.
Jasprit Bumrah upset?
दरम्यान, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर संघाचा स्फोटक गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.
कारण रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करू शकतो, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र हार्दिक पांड्या परत आल्यानंतर मुंबईचा धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
यामुळे जसप्रीत बुमराह नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात जसप्रीत बुमराहच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून या चर्चांना सकारात्मक दृष्टी प्राप्त झाली आहे.
“कधी कधी शांतता राहणे हेच सर्वोत्तम उत्तर असते”, अशी स्टोरी बुमराहने टाकली आहे. त्याने ही स्टोरी हार्दिक पांड्याच्या घरवापसीवर टाकली असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी! कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि.मध्ये भरती प्रक्रिया सुरू
- Jasprit Bumrah | मुंबईच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्याच्या एंट्रीनंतर बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार?
- Job Interview | नोकरीची मुलाखत देताना काय करायचं? जाणून घ्या सोप्या टिप्स
- Raj Thackeray | हिंदुत्वाबद्दल शिंदे सरकार फक्त तोंड वाजवतंय – राज ठाकरे
- Eknath Shinde | मराठा आरक्षणाबाबत जी छगन भुजबळांची भूमिका, तीच सरकारची भूमिका