Manoj Jarange | त्यांना समाजापेक्षा पक्ष मोठा ठरवायचा असेल तर त्यांना 24 तारखेनंतर कळलं; जरांगेंचा इशारा नेमका कुणाला?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | बुलढाणा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाचं जालना जिल्ह्यात सुरू झालेलं हे आंदोलन आज संपूर्ण राज्यात पसरलं आहे.

मराठ्यांचं  हे आंदोलन मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मराठा आरक्षणावर ठोस तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे. अशात आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ( Manoj Jarange ) पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “सरकारला दिलेला शब्द पाळावा लागणार आहे. नाहीतर त्यांना 24 डिसेंबरनंतर कळेल.

सरकारला समाजापेक्षा पक्ष मोठे ठरवायचे असतील, तर त्यांना 24 तारखेनंतर कळेल. माझा गोरगरीब मराठा समाज खूप दिवसांपासून आरक्षणापासून दूर आहे.

मात्र आता आमच्या नोंदी सापडत आहे. याचा अर्थ असा की आम्हाला आरक्षण होतं. जाणून-बुजून आम्हाला हे आरक्षण दिलेलं नाही. यांनी आमचं वाटोळ केलं आहे.

परंतु, आता आमचं आंदोलन यशस्वी होताना दिसत आहे. कारण आमच्या लाखो नोंदी सापडत आहे. आमचं राहिलेलं आंदोलन 24 डिसेंबर पर्यंत यशस्वी होणार. तोपर्यंत आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार. आम्हाला कोणी आडवं आलं तर त्यांना ते 24 डिसेंबरनंतर कळेल.”

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. उद्या (6 डिसेंबर) या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

चार सदस्यांच्या खंडपीठासमोर हे सुनावणी पार पडणार आहे. उद्या दुपारी दीड वाजता ही सुनावणी सुरू होईल. या सुनावणीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या