Protein | शरीरातली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Protein | टीम महाराष्ट्र देशा: प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. निरोगी राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असणे खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे सेवन करत असतात. शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करू शकतात. या भाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघते आणि त्याचबरोबर आरोग्यही निरोगी राहते. शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील भाज्यांचा समावेश करू शकतात.

पालक (Spinach-For Protein)

शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश करू शकतात. पालकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एक कप शिजवलेल्या पालकामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी पालक उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्ही पालकाची भाजी, पालकाचे पराठे, पालकाचा ज्यूस इत्यादी गोष्टींचे सेवन करू शकतात.

ब्रोकोली (Broccoli-For Protein)

ब्रोकोलीमध्ये प्रोटीनसोबत विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. एक कप शिजवलेल्या ब्रोकोलीमध्ये सुमारे चार ग्रॅम प्रोटीन आढळून येतात, त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते. ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, आयरण, पोटॅशियम आणि विटामिन सी आढळून येते, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

हिरवे वाटाणे (Green peas-For Protein)

हिरव्या वाटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एक कप उकडलेल्या हिरव्या वाटाण्यांमध्ये सुमारे 8.58 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या वाटाण्यांचा समावेश करू शकतात. तुम्ही हिरव्या वाटाण्याचे पराठे किंवा भाजी बनवून त्याचे सेवन करू शकतात.

शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

लिंबू आणि आल्याचे पाणी (Lemon and ginger water-For Indigestion)

लिंबू आणि आल्याचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा किसलेले आले आणि आवश्यकतेनुसार लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात. या पाण्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या सहज दूर होऊ शकते.

बेकिंग सोडा (Baking soda-For Indigestion)

अपचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये दीड चमचा बेकिंग सोडा मिसळून घ्यावा लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या सहज दूर होते. त्याचबरोबर बेकिंग सोद्याच्या मदतीने ऍसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या