Hair Care | केसांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ प्रोटीन प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: शरीरामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन (Protein) असणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शरीरात मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असल्यास त्वचा (Skin Care) आणि केस निरोगी (Hair Care) राहू शकतात. म्हणूनच शरीरामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असणे खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. आहारामध्ये या गोष्टींचा समावेश केल्याने आरोग्यासोबतच केस निरोगी राहू शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात.

अंडी (Egg-For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकतात. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते, जे केसांची काळजी घेण्यास मदत करते. नियमित एक ते दोन अंडी खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते. यासाठी तुम्ही उकडलेल्या अंड्याचे सेवन करू शकतात.

दूध (Milk-For Hair Care)

दुधामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर दुधाचे नियमित सेवन केल्याने केसांसोबत शरीर देखील चांगले राहू शकते. नियमित दुधाचे सेवन केल्याने केस मजबूत होतात आणि केस गळती थांबते. त्याचबरोबर दुधाचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस चालना  मिळते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुधाचा समावेश करू शकतात.

पालक (Spinach-For Hair Care)

पालकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयरन उपलब्ध असते, जे केसांची काळजी घेण्यास मदत करते. पालकामध्ये आढळणारे गुणधर्म केसांना मुळापासून मजबूत बनवण्यास मदत करतात. नियमित पालकाचे सेवन केल्याने केसांसोबत आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पालकाची भाजी किंवा पालकाच्या रसाचे सेवन करू शकतात. नियमित पालकाचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील प्रोटीनयुक्त गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर ग्रीन टी पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील खालील समस्या दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर होतात (Removes blemishes on the face-Green Tea Water)

ग्रीन टीच्या पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होऊ शकते. ग्रीन टीचे पाणी त्वचेवरील घाण साफ करते. ग्रीन टीच्या पाण्यामध्ये अँटी-बॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे डागांची समस्या दूर करण्यास मदत करतात.

वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात (Signs of aging are reduced-Green Tea Water)

ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. नियमित या पाण्याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील दूर होऊ शकतात. रोज ग्रीन टी पाण्याने चेहरा साफ केल्याने ओपन पोर्सची समस्या देखील कमी होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button