Green Tea | ग्रीन टी पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या होतील दूर

Green Tea | टीम महाराष्ट्र देशा: ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करतात. ग्रीन टी आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी (Beneficial for Skin) देखील खूप फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये विटामिन बी, विटामिन के, अँटिऑक्सिडंट यासारखे गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही ग्रीन टीच्या पाण्याची मदत घेऊ शकतात. या पाण्याने चेहरा साफ केल्याने चेहऱ्यावरील अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टीच्या पाण्याने चेहरा साफ करू शकतात. ग्रीन टीचे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला ग्रीन टीची पाने पाण्यामध्ये उकळून कोमट करून घ्यावी लागेल. त्यानंतर या पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवावा लागेल. नियमित असे केल्याने त्वचेवरील खालील समस्या दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर होतात (Removes blemishes on the face-Green Tea Water)

ग्रीन टीच्या पाण्याच्या मदतीने चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होऊ शकते. ग्रीन टीचे पाणी त्वचेवरील घाण साफ करते. ग्रीन टीच्या पाण्यामध्ये अँटी-बॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे डागांची समस्या दूर करण्यास मदत करतात.

वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात (Signs of aging are reduced-Green Tea Water)

ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. नियमित या पाण्याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील दूर होऊ शकतात. रोज ग्रीन टी पाण्याने चेहरा साफ केल्याने ओपन पोर्सची समस्या देखील कमी होऊ शकते.

चेहऱ्याची जळजळ कमी होते (Reduces facial inflammation-Green Tea Water)

ग्रीन टीमध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे चेहऱ्यावर होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टीच्या पाण्याने चेहरा साफ केल्यावर खाज सुटणे, एलर्जी, त्वचेवर येणारा लालसरपणा यापासून सुटका मिळू शकतो.

ग्रीन टी पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्यावरील खालील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही केळीचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

मध आणि केळी (Honey & Banana-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी केळी आणि मध उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक केळी बारीक करून त्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. केळी आणि मधाच्या मिश्रणाने त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

दही आणि केळी (Curd & Banana-For Skin Care)

चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी केळी आणि दह्याचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. दही आणि केळी चेहऱ्याला लावल्याने त्वचा फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित राहू शकते. यासाठी तुम्हाला एक केळी बारीक करून त्यामध्ये एक चमचा दही मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा वापरल्याने तुमच्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.