Panjabi Food | टीम महाराष्ट्र देशा: पंजाब हे राज्य पर्यटनासोबतच खाद्यपदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पंजाबच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. या ठिकाणचे चविष्ट पदार्थ पर्यटकांना आकर्षित करते. तुम्ही पण जर पंजाबच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पंजाबमधील काही उत्कृष्ट पदार्थांबद्दल माहिती सांगणार आहोत. पंजाबला फिरायला गेल्यास पुढील पदार्थ खायला विसरू नका.
छोले भटूरे
पंजाबचे छोले भटूरे जगप्रसिद्ध आहे. या छोले भाटूऱ्यांचा आनंद घ्यायला देश-विदेशातील पर्यटक पंजाबला भेट देतात. पंजाबमध्ये छोले बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. जर तुम्ही पंजाबला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही छोले भटूऱ्यांचा नक्की आस्वाद घेतला पाहिजे.
पराठे
पराठा भारतामध्ये कुठेही सहज उपलब्ध असतो. परंतु पंजाबचा पराठा काही वेगळाच असतो. पंजाबचे पराठे जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये तुम्हाला पराठ्यांचे भरपूर प्रकार बघायला मिळतील. या ठिकाणी दही, लोणी आणि लोणच्यासोबत पराठे खाल्ले जातात.
कुलचे
तुम्ही जर पंजाबला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कुलच्याचा नक्की आनंद घेतला पाहिजे. कुलचे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात. कुलच्याचा आनंद वाढवण्यासाठी त्याच्यासोबत छोले आणि चटणी वाढली जाते.
लस्सी
लस्सी ही भारतामध्ये सर्वत्र उपलब्ध असते. मात्र, पंजाबच्या लस्सीची मजा काही वेगळीच आहे. पंजाबमध्ये लस्सी बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. लस्सीची चव देशामध्ये मिळणाऱ्या इतर लस्सी पेक्षा खूप वेगळी असते. त्यामुळे पंजाबला भेट द्यायला गेल्यावर तिथल्या लस्सीची चव घ्यायला विसरू नका.
महत्वाच्या बातम्या
- MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार
- Skin Care | चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक वाढण्यासाठी सफरचंदाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- BJP | कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचं विरोधकांना पत्र
- Electric Bike | भारतात लाँच झाली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक, सिंगल चार्जरवर देईल 135 किमी रेंज
- Adventure Trip Guide | ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर