🕒 1 min read
दिल्ली – घरातलं मोठं झाड कोसळलं की पारंब्यांचा आधार तुटतो का? बॉलिवूडचे धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानंतर देओल कुटुंबात दुफळी झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आणि १५ दिवसांनी येऊ घातलेला त्यांचा ९० वा वाढदिवस अपूर्ण राहिला. त्यांच्या जाण्याने केवळ सिनेसृष्टीच नाही, तर जगभरातील चाहते हळहळले. पण त्यानंतर २७ नोव्हेंबरला जे घडलं, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले.
त्या दिवशी सनी आणि बॉबी देओल यांनी ताज लँड्समध्ये, तर हेमा मालिनी (Hema Malini) यांनी त्यांच्या घरी वेगवेगळ्या शोकसभा आयोजित केल्या. सनी-बॉबीच्या कार्यक्रमात हेमाजी किंवा ईशा-आहना दिसल्या नाहीत. त्यामुळे “देओल कुटुंबात सर्व काही आलबेल नाही का?” अशा कुजबुजीला सुरुवात झाली.
पण, आता खुद्द ‘ड्रीम गर्ल’नेच सत्य सांगितलंय…
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्या (Hema Malini) म्हणाल्या, “हा आमच्या घरातील वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आपापसांत बोलूनच हे ठरवलं होतं. माझे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सहकारी वेगळे असल्याने मी माझ्या घरी आणि दिल्लीत वेगळी प्रार्थना सभा घेतली.” इतकंच नाही तर, मथुरा मतदारसंघातील चाहत्यांसाठीही त्यांनी विशेष आयोजन केलं होतं. “मी जे केलं, त्यात मी समाधानी आहे,” असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
प्रकाश कौर आणि सनी-बॉबीसोबत वाद?
हेमा मालिनी यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर (Prakash Kaur) आणि सनी-बॉबी यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं. “आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही,” असा दिलासा त्यांनी चाहत्यांना दिला.
ज्या फार्महाऊसवर धर्मेंद्र यांचं सर्वाधिक मन रमायचं, त्या लोणावळ्याच्या फार्महाऊसचं काय होणार? तर सनी देओल तिथे धर्मेंद्र यांच्या आठवणी जपणारे संग्रहालय (Museum) उभारण्याचा प्लॅन करत असल्याचं हेमाजींनी सांगितलं. त्यामुळे ‘हीमॅन’चा वारसा आता जपला जाणार, हे नक्की.
📌 महत्वाच्या बातम्या
- “भाजपने २० वर्षांच्या निष्ठेची ‘ती’ परतफेड केली…”; डोंबिवलीच्या इन्फ्लुएन्सरचा संताप, अखेर राज ठाकरेंनी दिला आधार!
- “नार्वेकरांनी ‘मवाली’सारखी दमदाटी केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल कराच!”; काँग्रेसचा एल्गार, राष्ट्रपतींकडेही केली मोठी मागणी
- RCB ला मोठा धक्का, एलिस पेरीने मैदान सोडलं! WPL सुरू होण्याआधीच ३ स्टार खेळाडूंची माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












