Share

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

🕒 1 min readWeight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन (Weight gain) ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन (Weight gain) ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकतात. या टिप्स फॉलो केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. या टिप्स फॉलो केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहू शकते. उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

पोहणे (Swimming-Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी पोहणे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पोहल्याने वजन कमी होते आणि शरीरही निरोगी राहते. त्याचबरोबर पोहल्याने फ्रेश वाटते. उन्हाळ्यामध्ये झपाट्याने वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमित पोहू शकतात.

टरबूज (Watermelon-Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी टरबूज उपयुक्त ठरू शकते. टरबुजामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते, जे वजन कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नियमित टरबुजाचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते.

पाणी (Water-Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परिणामी वजन नियंत्रणात राहते. जेवणापूर्वी पाणी पिणे हा वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय मानला जातो. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही वरील टिप्स फॉलो करू शकतात. त्याचबरोबर राजगिऱ्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

हाडे मजबूत राहतात (Bones remain strong-Rajgira Benefits)

शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी राजगिरा उपयुक्त ठरू शकतो. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने दात मजबूत होण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते (Blood sugar stays under control-Rajgira Benefits)

तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर राजगिऱ्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. राजगिरा नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल्यास डायबिटीसचा धोका कमी होतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या