Watermelon | उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Watermelon | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये टरबूज बाजारात सहज उपलब्ध असते. या ऋतूमध्ये टरबूत खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला (Skin Benefits) देखील अनेक फायदे मिळतात. टरबुजामध्ये आयरन, फायबर, पोटॅशियम, सोडियम आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते, जे आरोग्यसोबत त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहू शकते. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये टरबूज खाल्ल्याने त्वचेला खालील फायदे मिळू शकतात.

त्वचा चमकदार होते (The skin becomes shiny-Watermelon For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये योग्य प्रमाणात टरबूज खाल्ल्याने त्वचा चमकदार राहू शकते. टरबूजामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचेला आतून पोषण देऊन त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. टरबुजाचे नियमित सेवन केल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

त्वचा हायड्रेट राहते (Skin stays hydrated-Watermelon For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये टरबूज खाल्ल्याने त्वचा ताजी आणि हायड्रेट राहते. टरबूज त्वचेला आतून मॉइश्चरायझ ठेवण्याचे काम करते.

कोरड्या त्वचेची समस्या दूर होते (Dry skin problem is eliminated-Watermelon For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये टरबूज खाल्ल्याने कोरड्या त्वचेची समस्या सहज दूर होऊ शकते. टरबूजामध्ये आढळणारे मॅग्नेशियम त्वचेला मॉइश्चरायझ करते, परिणामी त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर होते. उन्हाळ्यामध्ये माफक प्रमाणात टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील कमी होऊ शकतात.

उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

बडीशेप (Fennel-For Bad Breath)

बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बडीशेपचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. त्याचबरोबर श्वासातून येणारा दुर्गंधही दूर होतो. जेवणानंतर बडीशेपचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर बडीशेपचा सुगंध तोंडाला फ्रेश ठेवून दुर्गंधी दूर करतो.

लवंग (Cloves-For Bad Breath)

लवंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लवंगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला लवंग हलक्या स्वरूपात भाजून घेऊन हवाबंद डब्यात साठवून ठेवावे लागेल. तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही या लवंगांना चघळू शकतात. नियमित असे केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि घशातील संसर्ग देखील दूर होऊ शकतो. त्याचबरोबर या लवंगाच्या मदतीने श्वासातील दुर्गंधी दूर होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button