Wrinkles | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Wrinkles | टीम महाराष्ट्र देशा: अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने त्वचेला सुरकुत्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने त्वचा निरोगी राहू शकते. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही खालील उपायांचा अवलंब करू शकतात.

कोरफड (Aloevera-For Wrinkles)

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म चेहऱ्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर कोरफडीच्या मदतीने त्वचा हायड्रेट राहू शकते. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर साधारण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा कोरफडीचा वापर करू शकतात.

केळीचा मास्क (Banana mask-For Wrinkles)

केळी चेहऱ्याला निरोगी ठेवण्याचे काम करते. केळीमध्ये नैसर्गिक तेल आणि विटामिन्स आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक केळी मॅश करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. केळीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची संबंधित अनेक समस्या दूर करू शकतात.

तेल मालिश (Oil massage-For Wrinkles)

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही तेल मालिश करू शकतात. तेलाने मसाज केल्यावर चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते. यासाठी तुम्ही बदाम तेल किंवा खोबरेल तेलाने चेहऱ्याची मसाज करू शकतात. चेहऱ्याची नियमित मसाज केल्याने वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही बटाट्याचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

मध आणि बटाटा (Honey and Potato Facepack-For Skin Care)

बटाटा आणि मध दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बटाटा चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत करतो. तर मध त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला दोन चमचे बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर साधारण पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील अतिरिक्त घाण निघून जाऊ शकते.

टोमॅटो आणि बटाटा (Tomato and Potato Facepack-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी बटाटा आणि टोमॅटो उपयुक्त ठरू शकतो. कारण या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचेवरील डाग साफ करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला एक चमचा बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा टोमॅटोचा रस मिसळून घ्यावा लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकतात.

मुलतानी माती आणि बटाटा (Multani Mati and Potato Facepack-For Skin Care)

चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी बटाटा आणि मुलतानी माती फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एका भांड्यात दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा बटाट्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या