Health Tips| चहा कॉफीने नाही, तर ‘या’ गोष्टीने करा दिवसाची सुरुवात, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. कारण हे दोन्ही पेय प्यायल्याने सुस्ती दूर होऊन मूड फ्रेश होतो. कॉफीमध्ये आढळणारे कॉफीन झोप आणि आळस दूर करतात. त्याचबरोबर चहाचे सेवन केल्याने देखील आळस दूर होतो. मात्र, या दोन्ही गोष्टींचे अति प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे झोप आणि आळस घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या गोष्टींनी करण्याऐवजी खालील गोष्टींनी करू शकतात. खालील गोष्टींनी दिवसाची सुरुवात केल्यावर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

खजूर (Dates-Health Tips)

सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा आणि कॉफीच्या ऐवजी खजुराचे सेवन करू शकतात. खजुरामध्ये नैसर्गिक साखर आढळून येते. त्यामुळे खजुराचे सेवन केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते. यासाठी तुम्ही सकाळी 4 ते 5 खजुराचे सेवन करू शकतात. खजुराचे सेवन केल्याने आरोग्याला पूर्ण पोषण मिळते.

संत्रा (Orange-Health Tips)

संत्र्याला विटामिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, फॉस्फरस आणि मिनरल्स आढळून येतात. हे सर्व घटक शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चहा, कॉफीने न करता संत्र्याच्या रसाने किंवा फक्त संत्री खाऊन करू शकतात.

बदाम (Almonds-Health Tips)

बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर त्याचबरोबर अनेक पोषक घटक आढळून येतात. बदामामध्ये विटामिन बी देखील आढळून येते, जे शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते. तुम्ही सकाळी चहा कॉफी ऐवजी चार ते पाच बदाम खाऊ शकतात. सकाळी बदामाचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटू शकते.

सकाळी चहा कॉफी ऐवजी तुम्ही वरील गोष्टींचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर शरीरातील मेटाबोलिजम सुधारण्यासाठी तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करू शकतात.

डाळी आणि शेंगा (Pulses and legumes-For Metabolism)

मेटॉलिझम वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळी आणि शेंगांचा समावेश करू शकतात. याच्या नियमित सेवनाने स्नायू निरोगी राहतात आणि पचनक्रिया देखील मजबूत होते. यामध्ये तुम्ही मूग, हरभरा, शेंगदाणे, मसूर इत्यादी खाद्यपदार्थांचे सेवन करू शकतात.

नारळ आणि खोबरेल तेल (Coconut and coconut oil-For Metabolism)

खोबरेल तेल आणि नारळाच्या सेवनाने शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील मेटॉलिझम नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर खोबरेल तेलाचे सेवन केल्याने वजन नियंत्रण राहू शकते. त्यामुळे नारळ आणि खोबरेल तेल तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आंबट पदार्थ (Sour food-For Metabolism)

आंबट पदार्थांचे सेवन करणे मेटॉलिझम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्रा, लिंबू, द्राक्ष इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते. त्यामुळे मेटॉलिझम वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आंबट पदार्थांचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button