Share

येवल्यात मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal | येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक यांच्यात जोरदार वाद झाला आहे.

मनोज जरांगे पाटील हे आज येवला दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी येवल्यात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर मनोज जरांगे पाटील शिवसृष्टी उभारलेल्या ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले.

शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते सभास्थळाच्या निघाले असताना अचानक मराठा कार्यकर्ते आणि छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भुजबळ समर्थकांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत आंदोलकांनी रस्ता रोको सुरू केला. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. यावेळी मराठा समर्थकांची जोरदार घोषणाबाजी केली.

Dispute Between Manoj Jarange and Chhagan Bhujbal Party worker

महत्वाच्या बातम्या

Maratha Reservation Devendra Fadnavis Yeola | Nashik Devendra Fadnavis Manoj Jarange Manoj Jarange Patil Chhagan Bhujbal

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now