Manoj Jarange Patil Live
वेळेप्रसंगी मी मरण पत्करेन पण मागे सरणार नाही
वेळेप्रसंगी मी मरण पत्करेन पण मागे सरणार नाही. तुमची मान खाली घालू देणार नाही.
आचारसंहिता लागल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे, तोपर्यंत वाट पाहायची
आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो की सुट्टी नाही. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही सर्वांनी ऐकायचं. ते काय करतात हे सगळं पाहायचं. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचं. तुमच्या मनात जे आहे, ती ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारच आहे.
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार
क्षत्रीय मराठ्यांना लढायचं शिकवलं आहे. आल्यासमोर अन्याय करणारे असतील तर समोरच्यांना उखडून फेकावंच लागणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. सगळ्या जातींसाठी लढणारा हा समाज आहे.
मला चारही बाजूने घेरलं आहे. माझा समाजाला, माझ्या समाजाच्या लेकरांना कलंक लागू देऊ नका
मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरले आहेत. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. समाज सांभाळा. मला चारही बाजूने घेरलं आहे- मनोज जरांगे
गोरगरिबाच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू
मी आज अन्यायाविरोधील एक गोष्ट सांगणार आहे. लढायचं शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात शिकवलं. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवलं आहे. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.
आम्ही क्षत्रीय मराठे, आम्ही कधीच गप्प बसत नाही- मनोज जरांगे
आम्ही नेमकं काय केलं आहे. एक महत्त्वाचा विषय सांगतो. हा विषय जातीत आणि राजकारणात मोडत नाही म्हणून त्याचा इथे उल्लेख करतो. आम्ही कधीच गप्प बसत नाही. कारण आम्ही क्षत्रीय मराठे आहोत. मी फार विचित्र प्राणी आहे. माझ्या एखाद्या शब्दामुळे माझ्या समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील म्हणून मी बोलत नाही.
मला फक्त तुमच्याकडून एकच वचन हवंय, हट्ट करायचा नाही- मनोज जरांगे
मला तुमच्याकडून एकच वचन हवंय. फक्त हट्ट करून नका. मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला ते करावंच लागेल. मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. मी आता त्यांना माझा इंगा दाखवतो. ते नाटकं करत आहेत.
न्याय मिळाला नाही तर यावेळी उलथापालथ करावीच लागेल- मनोज जरांगे
जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपल्याला यावेळी उलथापालथ करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या नाकारव टिच्चून कुठला निर्णय होणार असेल आणि या राज्याच्या समाजावर अन्याय होणार असेल गाडावच लागणार. शेवटी आपल्याला आपला समूदाय महत्तवाचा आहे. जनता महत्त्वाची आहे. आपल्यासाठी आपला शेतकरी महत्त्वाचा आहे.
आपल्याला डावललं जातंय, आल्यावर अन्याय होतोय
तुमचे लेकरं अधिकारी बनलेले पाहायचे आहेत. आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र आपले लेकरं प्रशासनात घातल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपल्याला डावललं जातंय. आपल्यावर अन्याय होतोय- मनोज जरांगे
मराठा समुदायावर संस्कार आहेत, मराठा कधीही कोणावर जातीभेद करत नाही
मराठा समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही कोणावर जातीभेद करत नाही. हा समुदाय मस्तीत, मग्रुरीत वागला नाही. या समाजाने प्रत्येकाला साथ देण्याचं काम केलं. या समाजाने कधीच जातीवाद केला नाही. या समाजाला जात कधी शिवली नाही. मनोज जरांगे पाटील
महत्वाच्या बातम्या