Marathi Bigg Boss Winner | ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा आज फिनाले पार पडतोय. फिनालेला आज 6 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सुरूवात झालीये. रितेश देशमुख फिनालेला होस्ट करतोय. रितेश देशमुख आपल्या खास स्टाईलमध्ये फिनालेला होस्ट करताना दिसतो आहे. 7o दिवसांनंतर बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा होत आहे.
जान्हवी किल्लेकर नऊ लाखांची रक्कम घेऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून अंकिता वालावलकर, धनंजय पोवार हे अनुक्रमे बाहेर पडले होते.
निकी तांबोळी, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 3 मध्ये पोहोचले होते. त्यानंतर टॉप 3 मध्ये असलेली निकी तांबोळी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 2 मध्ये पोहोचले होते.
Bigg Boss Marathi Season 5 Winner
सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता ठरला आहे.
घटनाक्रम
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner 2024
Bigg Boss Marathi Season TOP 5
सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी आणि धनंजय पोवार टॉप 5 मध्ये पोहोचले आहेत.
Bigg Boss Marathi Season TOP 4
अंकिता वालावलकर हिचा आता बिग बॉसच्या घरातील प्रवास संपवला आहे. निकी तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण हे टॉप 4 मध्ये पोहोचले आहेत.
Bigg Boss Marathi Season TOP 3
धनंजय पोवार बिग बॉसच्या घरातून बाहेर तर निकी तांबोळी, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 3 मध्ये पोहोचले आहेत. या तिघांपैकी एकजण बिग बॉसचा विजेता होणार आहे.
Bigg Boss Marathi Season TOP 2
निकी तांबोळी बिग बॉसच्या घरातून बाहेर तर अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 2 मध्ये पोहोचले आहेत.
Bigg Boss Marathi Season 5 Winner
सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या