Deepak Kesarkar | “तुमच्याशेजारी रावण बसलाय, तो रोज सकाळी…”; संजय राऊत केसरकरांच्या निशाण्यावर

Deepak Kesarkar | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. ‘शिवसेनेचं चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि हे 100 टक्के सत्य आहे’, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर?

“ठाकरे गटातले लोक धनुष्यबाणाबद्दल काहीही बोलत आहेत. आम्ही अयोध्येला जाणार आहोत. तिथे आम्ही धनुष्यबाणाची पूजा करून रामाचा धनुष्यबाण घेऊन येणार आहोत. पण रावण कोण आहे माहतीय का? रावण त्यांच्याशेजारी उद्धव ठाकरे यांच्या बसला आहे. हा रावण दररोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेत असतो. आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही.”, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“राऊतांवर कारवाई झाली पाहिजे” (Deepak Kesarkar talk about Sanjay Raut)

“निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली आहे. “सातत्याने बेताल वक्तव्य करत असल्याबद्दल संजय राऊत यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. विधिमंडळ कार्यालय हे कुणाच्या मालकीचं नसतं सरकारचं असतं. ते उद्धव ठाकरे यांच्या मालकीचं देखील नाही. आम्ही कोणावरही मालकी सांगितली नाही, सांगणारही नाही”, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

संजय राऊतांचा दावा

“मी काल स्पष्ट सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो की चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी 2 हजार कोटींचा सौदा झाला. निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की निकाल आपल्याच बाजूने लागेल. मिंधे गटाचे लोक, एक केंद्रीय मंत्रीसुद्धा हाच दावा करत होते. तेव्हाही माझ्याकडे माहिती होती की यासाठी 2 हजार कोटींचा सौदा झाला आहे. “माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे न्याय आणि निर्णयात फरक आहे. निर्णय हा प्रचंड पैशाचा वापर करुन विकत घेण्यात आला आहे”, तसंच लवकरच आपण या संदर्भातले पुरावे देऊ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.