Share

Gulabrao Patil | “ते कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा…”;  पक्षाची कार्यालयं आणि निधीबाबत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य

Gulabrao Patil | जालना : राज्यात सत्तासंघर्षामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे-शिंदे गटामधला वाद चिघळला आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन, पक्षाची कार्यालये आणि पक्षाचा निधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला … Read more

Published On: 

Gulabrao Patil | जालना : राज्यात सत्तासंघर्षामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे-शिंदे गटामधला वाद चिघळला आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन, पक्षाची कार्यालये आणि पक्षाचा निधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा काहीही उद्देश नाही”

“शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा काहीही उद्देश नाही. मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीतही दोन गट पडले होते. तेव्हा मुलायम सिंह यादव यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्याकडे संख्येच्या आधारावर पक्षाचं चिन्ह गेलं होतं. त्यामुळे यामध्ये कुणीही राजकारण करू नये, ही अपेक्षा आहे”, असं गुलाबराव पाटील स्पष्टपणे म्हणाले आहेत.

“शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची”

“आम्ही कुठलंही कार्यालय ताब्यात घेणार नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. ही शिवसेना पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत,” असंही गुलाबराव पाटील म्हणाले. शिंदे गटाकडून पक्षाच्या निधीवर दावा केला जाणार का? असं विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, “तो दावा करण्याची आम्हाला गरज नाही. शेवटी पैसे कुठे आहेत? हेही आम्हाला माहीत नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे.

आपण शिवसेनेच्या कोणत्याही कार्यालयावर दावा सांगणार नाही. आम्हाला पक्षाच्या निधीची गरज नाही. तसेच ते पैसे कुठे आहेत, याचीही आम्हाला कल्पना नाही, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. दरम्यान याबाबत आता शिंदे गटाने कार्यालय आणि निधीबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही