Walmik Karad । मागील दीड महिन्यापासून खंडणी प्रकरणात अटकेत असणारा वाल्मिक कराड चांगलाच चर्चेत आला आहे. सतत त्याच्याबद्दलचे धक्कादायक खुलासे केले जातात. आज त्याला न्यायालयाने पुन्हा मोठा धक्का देत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच कालच वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा आहे असे बोललं जात आहे. यामुळे देखील वाल्मिक कराड याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे बोलले जात आहे.
अशातच आता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक (Avinash Pathak) यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी गंभीर आरोप केले आहेत. भैया पाटील यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.
“बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची लवकरात लवकर चौकशी करा ते गुन्हेगार लोकांसोबत अनेक वर्षांपासून सोबत आहेत. बीड जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब हे गेल्या १५ वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध प्रशासकीय पदावर सेवेमध्ये आहेत. श्री अविनाश पाठक साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळामध्ये सदस्य अशा विविध पदावर काम केले आहे.”
Bhaiya Patil criticizes Avinash Pathak
“अविनाश पाठक हे वाल्मिक कराड याचे फ्रंटमॅन म्हणून काम करतात. त्याला बीडच्या प्रशासनाच्या सर्व किल्ल्या पाठक यांनी दिल्यात. पाठक साहेबांच्या अगोदर वाल्मिकचे आदेश उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तलाठी यांनी मानावेत असे मौखिक आदेश जिल्हाधिकारी पाठक यांनी दिलेले. महसूल मधले सगळे घोटाळे पाठक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात केले आहे. आज एक दिवस सुद्धा पाठक साहेबांची चौकशी झालेली नाही. पाठक साहेबांच्या पाठीमागे कोण आहे? धनंजय मुंडे पाठक साहेबांना वाचवतायेत का?? बीड जिल्हाधिकारी कोणाच्या हाताचे खेळणे आहे??” असा सवाल भैया पाटील यांनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :