Bacchu Kadu | “आधी कोर्टाच्या तारखा ऐकत होतो, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या”; बच्चू कडूंची टीका

Bacchu Kadu | नागपूर : राज्यात गेल्या 7 महिन्यापूर्वी शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 7 महिने उलटूनही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे. या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. मी आधी कोर्टाच्याच तारखा ऐकत होतो, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा ऐकत आहे”, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

‘तारीख पे तारीख’

“माझ्या वाट्याला काय आलं, हे महत्वाचं नाही, तर माझ्या दिव्यांग बांधवांच्या वाट्याला मंत्रालय ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालय यांचे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं सध्यातरी दिसतंय आणि या निकालानंतरही विस्तार झाला नाही, तर मग तो 2024च्या निवडणुकांनंतर होईल”, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले आहे.

‘जो जिंकणार, तोच होणार मंत्री’

थोड्या कालावधीसाठी मंत्रिमंडळ विस्तार करायचा आणि आमदारांची नाराजी ओढवून घ्यायची, असा विचार कदाचित कुठेतरी होत असेल. त्यामुळे बहुतेक 2024च्या निवडणुका झाल्यानंतरच विस्तार होईल, असे वाटते. 2024च्या विधानसभा निवडणूकीत ‘जो जिंकणार, तोच होणार मंत्री’, असे बच्चू कडू म्हणाले.

शिंदे गट आणि भाजप राजकीयदृष्ट्या मजबूत

कुणाच्या नाराजीचा काही विषय नाही. कारण एकनाथ शिंदे गट आणि भाजप राजकीय दृष्ट्या मजबूत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आणि भाजपमधील कुणी बाहेर जाईल, अशी स्थिती नाही आणि तशी ताकतही कुणात नाही. मात्र इतर पक्षातील लोक शिंदे गट किंवा भाजपमध्ये येतील, अशी स्थिती आहे, असेही बच्चू कडूंनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.