Amruta Fadnavis | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अखेर बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत

Braking | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक केली होती. आता अनिक्षाचे वडिल बुकी अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानी याला अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे. जयसिंघानिया याला अटक केल्याने आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

Amrita Fadnavis blackmailing case Anil Jaisinghani arrested

अमृता यांना एक कोटी रुपयांच्या लाचेचीही ऑफर दिली होती. तसेच त्यांना टेक्स्ट मेसेज, व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी विरोधात मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी उल्हानगरला जाऊन अनिक्षा हिला अटक केली होती.

त्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानी याला पकडण्यासाठी एक पथक तयार केलं होतं. हे पथक गुजरातलं गेलं आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. अटक केल्यानंतर जयसिंघानी याला आता मुंबईत आणल्या जात आहे. त्याला उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे. तसेच अनिल आणि अनिक्षा या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण?

एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला.

अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-