Devendra Fadnavis News: एका बड्या नेत्याची लवकरच उपपंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मोदींचे वारसदार म्हणून या व्यक्तीची उपपंतप्रधानपदी नियुक्ती करावी, यावर आरएसएस (RSS) वर्तुळात एकमत होत चालले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा दावा आहे की, याच कारणामुळे मोदी सरकारच्या (Modi Govt) मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे.
राऊत यांचे हे विधान थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उद्देशाने केलेले आहे. संघाचा आग्रह फडणवीस यांना उपपंतप्रधान बनवण्याचाच आहे, असे ते ठामपणे सांगतात. यासंदर्भातील तपशील लवकरच समोर येतील, असे राऊत यांनी म्हटल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Devendra Fadnavis Deputy PM claim
खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला. यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, पीएम इन वेटिंग असलेले लोक कधीच पंतप्रधान होत नाहीत, असा या देशाचा इतिहास आहे आणि सध्या तरी देशात पंतप्रधान पदासाठी कोणतीच व्हॅकन्सी नाही आहे. या विधानाला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. त्यांनी चार मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही महत्त्वाची माहिती उघड केली.
फडणवीस यांना दिल्लीत बोलावून त्यांच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. संघातील सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात नसलेल्या आणि दिल्लीच्या राजकारणात सक्रिय नसलेल्या एका प्रमुख नेत्याची उपपंतप्रधानपदी नियुक्ती केली जाणार आहे.
मोदींचे वारसदार म्हणून निश्चित केलेल्या व्यक्तीने आधी उपपंतप्रधान म्हणून काम पाहावे, असे संघाचे मत आहे आणि त्या दिशेनेच संघांतर्गत चर्चा सुरू आहेत. आपण देत असलेली माहिती लवकरच सार्वजनिक होईल, असा दावा राऊत यांनी केला.
देशात पंतप्रधान आणि गृहमंत्री ही पदे रिक्त आहेत. फडणवीस यांना याची कल्पना नसेल, तर मी त्यांना ती देऊ शकतो. सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत किंवा ‘वेटिंग’वर अमित शहा आहेत. या देशात गृहमंत्री पुढे जाऊन पंतप्रधान झाल्याचा कोणताही दाखला नाही.
सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते, पण ते पंतप्रधान झाले नाहीत. अमित शाह हे प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं ते मानतात. लोक मानत नाही. ते पंतप्रधान होणार नाहीत. त्यानंतर राजनाथ सिंह यांचा क्रमांक लागतो, पण त्यांच्याबाबतही काही शंका किंवा साशंकता आहे, असे राऊत म्हणाले.
संघाने उपपंतप्रधानपदाच्या नियुक्तीचा आग्रह धरला आहे आणि त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही मंत्र्यांनी राजीनामा देणे आवश्यक असते, परंतु ज्येष्ठ मंत्र्यांनी तसे करण्यास नकार दिला आहे.
आधी शाह यांचा राजीनामा घ्या. मग आम्ही राजीनामा देतो. शाहांपासून सुरुवात करा, असे या वरिष्ठ मंत्र्यांनी म्हटले आहे. अमित शाह यांच्या पेक्षा अधिक काळ सत्तेत घालवलेले हे मंत्री आहेत. फेरबदल करायचे असेल तर शाहांचा राजीनामा घ्या. नाही तर तुमच्या अधिकारात आम्हाला बरखास्त करा, असा पवित्रा या मंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळेच मोदी सरकारचा विस्तार रखडल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘भैय्या चाटम’ स्टंटबाजी करत आहेत; मनसेकडून अमित साटमांच्या ‘त्या’ वक्तव्याचा खरपूस समाचार
- शिवसेना चिन्ह आणि मोदींच्या दौऱ्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा; महागाईवरूनही सरकारला घेरलं
- धक्कादायक! जरांगेंच्या आंदोलनात शोककळा; अंतरवाली सराटीत 40 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











