Share

हवामान विभागाचा १९ राज्यांना धोक्याचा इशारा; महाराष्ट्रात पावसाची दडी संपणार? वाचा नवा अंदाज

देशातील १९ राज्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. तर, महाराष्ट्रातही सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Published On: 

 Maharashtra Rain Forecast:  IMD issues heavy rain alert for 19 states and monsoon update for Maharashtra

Maharashtra Rain Forecast: ऑगस्ट महिना कोरडा गेला, आता हातातोंडाशी आलेलं पीक वाचणार का? शेतकऱ्यांच्या मनातील याच प्रश्नाला आता थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, देशात मान्सून पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करण्याच्या तयारीत आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच एक मोठा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे येत्या २४ तासांत देशातील तब्बल १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.

महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी दडी मारली होती. पावसाअभावी खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला होता, पण आता सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Maharashtra Rain Forecast: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.

दुसरीकडे, देशातील यूपी, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेशसह १९ राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. डोंगर भागात भूस्खलनासारख्या घटनांचा धोका असल्याने नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install