Siddhivinayak Temple Audit : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात (Siddhivinayak Temple) कथित देणगी घोटाळ्याबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या पाच वर्षांत मंदिराला मिळालेल्या रोख देणग्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट (Audit) करण्याचे आदेश दिले आहेत.
या ऑडिटमध्ये मंदिराचे आर्थिक व्यवहार, देणग्यांची नोंद आणि त्यांचे एकूण व्यवस्थापन यांची सखोल तपासणी केली जाईल. परिणामी, माजी अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांचीही तपासणी होणार आहे. बांदेकर यांनी नोव्हेंबर २०२३ पर्यंत श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
Siddhivinayak Temple Audit ordered by Eknath Shinde
त्यामुळे चौकशीच्या कक्षेत गेल्या पाच वर्षांचा कालावधी येत असल्याने, बांदेकर यांच्या कार्यकाळातील देणग्या, दागदागिन्यांची नोंद आणि आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी केली जाईल. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडचणींचा सामना करावा लागेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मंगळवारी (४ ऑगस्ट) श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना विशेष ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या चौकशीत रोख देणग्या, सोने-चांदीचे दागिने, इतर मौल्यवान वस्तू, त्यांची नोंद व साठवणूक, आर्थिक व्यवहार आणि मंदिर व्यवस्थापन यांची सविस्तर तपासणी केली जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष ऑडिटदरम्यान काही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास, संबंधित व्यक्तींवर नियमांनुसार कारवाई केली जाईल. या चौकशीमुळे मंदिराच्या आर्थिक कारभारात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Nitin Gadkari: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश
- ‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! मंत्रालयासमोर NCP आक्रमक
- ‘बुंदी आमच्या ताटात कधी पडेल ते पाहतोय’; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर राऊतांचे भाष्य












