दिल्ली– देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत का? हा प्रश्न आता विचारला जातोय, कारण शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यसभेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील गोंधळावरून देशभरात संतापाची लाट आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना थेट भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून अटक झालेले आठही जण भाजपचेच सदस्य असल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
NEET Paper: संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
“आम्ही तुम्हाला घाबरत नाही. मी महाराष्ट्राची स्थिती सांगतोय. पेपर कसा फुटतो ते बघा. या प्रकरणात राज्यातून सर्वाधिक लोकांना, म्हणजेच आठ जणांना अटक झाली असून ते सर्व भाजपशी संबंधित आहेत. हे सांगताना मला खरोखरच दुर्दैवी वाटतंय,” अशा शब्दांत राऊतांनी सरकारला घेरलं. नीट ही विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारी महत्त्वाची परीक्षा आहे. पण इथं पूर्ण व्यवस्थाच कोलमडली असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना राऊत अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “वरपासून खालपर्यंत सगळीकडे पेपर फुटत आहेत. तुम्ही मोठ्या पदांवर लोकांना बसवता, पण त्यांच्याकडून न्याय मिळत नाही. तुम्ही संपूर्ण व्यवस्थेचीच बरबादी केली आहे. ज्या देशात राम मंदिराच्या देणगीत चोरी होते, तिथं पेपर फुटणं वेगळं नाही,” असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
दुसरीकडे, या पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘सीजेपी’ने (कॉकरोच जनता पार्टी) दिल्लीच्या जंतरमंतरवर उग्र आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनाला ठाकरे गटानेही उघड पाठिंबा दिला होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाकडून मोठा जल्लोषही करण्यात आला.
📌 महत्वाच्या बातम्या
- गुणरत्न सदावर्ते यांचा कंगना राणौतवर हल्लाबोल; मोहन भागवतांचा संदर्भ देत केली ‘ही’ मोठी मागणी
- नेपाळमध्ये कावड यात्रेवर भीषण हल्ला; ६ शहरांत संचारबंदी, लष्कर रस्त्यावर, नेमकं काय घडलं?
- महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं थैमान? IMD चा नवा अलर्ट, 10 जिल्ह्यांत हाय अलर्ट!













