क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा माणूस प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या सुनेशी कसा वागत असेल, याचा तुम्ही कधी विचार केलाय? मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) खऱ्या आयुष्यात किती साधा आणि कुटुंबवत्सल आहे, याची प्रचिती नुकतीच सर्वांना आली आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये सचिन, त्याची पत्नी अंजली आणि सून सानिया चंडोक एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. यावेळी सचिनने सानियाला अगदी प्रेमाने ‘तू चहा घेशील की कॉफी?’ अशी विचारपूस केली, ज्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
Sachin Tendulkar Viral Video
या व्हायरल व्हिडिओमध्ये तिघेही अगदी निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. संवादाचा आवाज स्पष्ट नसला तरी, सचिन सानियाला विचारतोय हे ओठांच्या हालचालींवरून स्पष्ट समजतंय. सानियाने हसून नकार दिल्यानंतर सचिनने स्टाफकडे स्वतःसाठी ब्लॅक कॉफीची ऑर्डर दिली.
एका मोठ्या स्टार खेळाडूचा हा साधेपणा चाहत्यांना चांगलाच भावलाय. व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय. एक चांगला खेळाडू असण्यासोबतच सचिन किती उत्तम माणूस आहे, याचं कौतुक नेटकरी करत आहेत. पैशांचा आणि प्रसिद्धीचा कोणताही गर्व या कुटुंबात दिसत नसल्याची चर्चा रंगली आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक नुकतेच, मार्च २०२६ मध्ये विवाहबंधनात अडकले. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. सानिया एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील असून ती स्वतःही एक यशस्वी उद्योजिका आहे.
नुकतंच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेही सचिनचा हाच संस्कारक्षम स्वभाव पाहायला मिळाला. बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या आठवणीत त्याने एक भावूक पोस्ट शेअर करत, ‘मला केवळ क्रिकेटपटूच नाही, तर चांगला माणूस बनवल्याबद्दल’ त्यांचे आभार मानले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोठा ट्विस्ट! गौतम गंभीरची खुर्ची धोक्यात? BCCI कडून व्हीव्हीएस लक्ष्मणला मोठी ऑफर
- माझ्या समर्थकांना ताब्यात घेण्यामागे सत्ताधारी भाजपच; प्रशांत किशोरांचा आरोप
- IMD चा मोठा इशारा! 21 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












