Share

मोदींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट महागात! दिल्ली पोलिसांचा मोठा अ‍ॅक्शन, अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सना नोटीस

CJP आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सना नोटीस बजावत संबंधित मजकूर हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

Published On: 

PM Modi

दिल्ली : देशाच्या विविध भागांत, विशेषतः राजधानी दिल्लीत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) द्वारे आयोजित निदर्शनांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सुरक्षा दलांविरुद्ध आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या.

या घटनांचे अनेक व्हिडिओ आणि ‘रील्स’ (Reels) सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. दिल्ली पोलिसांनी हे व्हिडिओ सोशल मीडिया खात्यांवरून हटवण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. ‘X’ वरील अनेक सक्रिय खात्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. त्यात पंतप्रधान मोदींविरुद्ध आक्षेपार्ह विधाने, घोषणा आणि टिप्पण्या असलेल्या पोस्ट्स हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

किती खात्यांना नोटिसा बजावण्यात आल्या?

ज्या खात्यांवरून असे व्हिडिओ पोस्ट केले गेले, त्या खात्यांबाबतची माहितीही पोलिसांनी मागवली आहे. मात्र, नोटिसा बजावण्यात आलेल्या खात्यांची नेमकी संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील विद्यार्थी आंदोलने आणि त्यानंतरच्या निदर्शनांदरम्यान सोशल मीडियावर शेअर केलेल्या मजकुराची पडताळणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग पथकांनी ‘X’ वर पोस्ट केलेले व्हिडिओ, फोटो, टिप्पण्या आणि संदेशांची तपासणी केली.

४०० हून अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख

यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी ४०० हून अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटवल्याचा दावा केला होता. या हँडल्सचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा आणि विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित खोटे दावे, अफवा व ‘डीपफेक’ व्हिडिओ पसरवल्याचा संशय आहे. अशा मजकुराचा उद्देश गोंधळ निर्माण करणे आणि वातावरण दूषित करणे असू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांचे सायबर सेल आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग पथके ऑनलाइन हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहेत. जर एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ कायद्याचे उल्लंघन करणारा, प्रक्षोभक मजकूर असलेला किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर करणारा आढळला, तर संबंधित सोशल मीडिया मध्यस्थ (intermediaries) आणि खातेधारकांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही