Share

राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण अंतिम टप्प्यात? मोदी-पवार भेटीनंतर दिल्लीत मोठी राजकीय घडामोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीनंतर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची घेतलेली भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग देणारी ठरत आहे

Published On: 

Modi-Pawar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. विलीनीकरणाचा उपक्रम एका टप्प्यावर रखडलेला दिसत असताना, अलीकडेच या प्रक्रियेला पुन्हा गती मिळाली आहे. दिल्लीत या संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्याचे वृत्त आहे. पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राजधानीत शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाची (NCP Merger) प्रक्रिया पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुधवारी दिल्लीतील जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि विद्यार्थ्यांकडून निदर्शने सुरू असताना, शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल दुसऱ्याच दिवशी शरद पवारांना भेटायला गेल्यामुळे मोदींसोबतच्या भेटीनंतर विलीनीकरणाची चाके गतिमान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संसदेत मांडण्यात आलेल्या लोकसभा मतदारसंघ परिसीमन विधेयकाबाबत चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) एनडीए (NDA)मध्ये सामील होणार असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. NDAमध्ये सामील होण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशी अट भाजप नेतृत्वाने घातल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडूनही विलिनीकरणाला विरोध असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यातील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

याशिवाय अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर तटकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, नुकत्याच घडलेल्या घडामोडींवरून असे दिसून येते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही