Share

…म्हणून डोक्यात माज गेला असं समजू नका; उद्धव ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करत सत्तेच्या अहंकारावर निशाणा साधला, तसेच राजीनाम्याबाबतही साशंकता व्यक्त केली.

Published On: 

Thackeray on Modi Govt

मुंबई : धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. गेल्या साधारण एका महिन्यापासून दिल्लीतील जंतरमंतर येथे हजारो तरुण आंदोलन करत होते. या आंदोलनाचे नेतृत्व ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने केले होते. अखेर या लढ्याला यश आले आहे. आता प्रश्न असा पडतो की, धर्मेंद्र प्रधान यांची जागा कोण घेणार? खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे केंद्रीय शिक्षणमंत्री होऊ शकतात. मात्र, राऊत यांच्या या अंदाजामध्येच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

देश अस्वस्थ आहे

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज (२५ जुलै) पत्रकार परिषद घेतली. या परिषदेदरम्यान त्यांनी २६ जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाबाबत माहिती दिली. ठाकरे बंधूंनी सांगितले की, हा मोर्चा आता विजय रॅली म्हणून काढला जाईल. त्याआधी, उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले. “गेल्या काही दिवसांपासून देश अस्वस्थ आहे. याचे कारण सर्वांनाच माहित आहे. सर्वप्रथम, मला अभिजीत दीपके आणि देशातील सर्व तरुणांचे अभिनंदन करायचे आहे. तसेच, ज्या पालकांनी त्यांना निर्भयपणे पाठिंबा दिला, त्यांचेही मला अभिनंदन करायचे आहे. या आंदोलनाने देशातील तरुणांची भीतीच्या छायेतून मुक्तता केली आहे,” असे ठाकरे म्हणाले.

केवळ सत्तेच्या खुर्चीवर बसला आहात म्हणून…

ते पुढे म्हणाले, “देशातील लोकांवर दबाव टाकला जात होता, जणू काही इथे नागरिकच उरले नाहीत. सध्याची परिस्थिती पाहून मला ‘एक मच्छर साला…’ हा संवाद आठवला. एका साध्या कॉकरोचमुळे हे सरकार गुडघ्यावर आले आहे. केवळ सत्तेच्या खुर्चीवर बसला आहात म्हणून सत्तेची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका.” उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार टीका केली आणि म्हटले की, या घटनांवरून देशातील युवाशक्ती एकत्र आल्यास काय करू शकते, हे दिसून येते.

राजीनाम्याबाबत…

मी दीपकेचे ट्विट पाहिले. त्याने आंदोलन मागे घेतलेले नाही. त्याच्या दोन मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. प्रधान यांचा राजीनामा ही मुख्य मागणी होती, जी पूर्ण झाली आहे. ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली असून, प्रधान यांनी खरोखरच राजीनामा दिला आहे की केवळ त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे, हे पाहणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. या राजीनाम्याबाबत ठाकरे यांनी साशंकता व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, २६ जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे यांच्या विजय रॅलीत काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही