Share

“…पण आमच्या हातात तिरंगा आहे”; शिवाजी पार्कमधून उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत तिरंग्याच्या बळावर लढण्याचा इशारा दिला.

Published On: 

Uddhav Thackeary

मुंबई : नीट (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) तर्फे आंदोलन (Student Protest) सुरू आहे. संसदेच्या दिशेने मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, ज्यामुळे देशभर निषेध व्यक्त केला जात आहे. आज मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन होत असून, यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि माणसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी सरकारला कडक इशारा दिला.

“माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. या चार दिवसांमध्ये आपण या जागेवर दुसऱ्यांना भेटलेलो आहोत. परवा मी दिल्लीला जाऊन आलो. रविवारी आपण पुन्हा भेटणार आहोत. या गर्दीचे एक वैशिष्ट आहे, अनेक जण सांगतात की इकडे आमच्या ओळखीचे कुणी नाही आहे आणि नेमकी हीच गोष्ट महत्त्वाची आहे, आपण सर्व भारतीय आहोत, हिंदूस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरायला भाग पाडून, आपल्याला भीती दाखवून आतापर्यंत आपल्यावर जे राज्य करत आहेत, त्यांनी हे दृष्य पहाण्यासारखे आहे,” असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला त्यावेळी अनेकांनी विचारले तुम्हाला काही बोलयाचे आहे का? तेव्हा मी म्हणालो मला काही बोलयाचे नाही, पण हा जनतेचा आवाज आहे आणि हा आवाज दिल्लीवाल्यांना ऐकावाच लागेल. मी तमाम देशबांधवांना सांगतोय, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ठीक आहे, मी आता सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदूका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदूका घेऊन या, मी तिरंगा घेऊन येतो. बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते.” असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही