Share

उद्धव ठाकरे यांची रामभक्ती बेगडी; पक्ष वाचवण्यासाठीच ‘रामरक्षा’ म्हणत आहेत : एकनाथ शिंदे

पंढरपूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा’ मोहिमेवर टीका करत त्यांची श्रीरामांवरील भक्ती ही केवळ पक्ष वाचवण्यासाठी असल्याचा टोला लगावला.

Published On: 

Eknath Shinde

पंढरपूर:  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे श्रीरामांवरील भक्ती बेगडी आहे. केवळ स्वतःच्या पक्षाची रक्षा करण्यासाठी ते आता रामरक्षा म्हणत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंढरपूर (Pandharpur) येथे ठाकरे यांना लगावला.

आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा’ (Ramraksha) मोहिमेवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे प्रभू श्रीरामांवरील प्रेम हे दिखाऊ आहे. त्यांनी यापूर्वी रामभक्तांचा ‘चोर, हरामखोर’ असा उल्लेख करत अपमान केला होता. आता केवळ पक्ष वाचवण्यासाठी त्यांना प्रभू श्रीरामांची आठवण झाली आहे. म्हणूनच त्यांनी ‘रामरक्षा’ म्हणण्यास सुरुवात केली आहे.”रमेश म्हात्रे यांच्यावरील हल्ल्याची घटना खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, डॉक्टरांवरील हल्लेही सहन केले जाणार नाहीत, असेही शिंदे यांनी नमूद केले. या प्रकरणावर पक्षाची भूमिका श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार तानाजी सावंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार समाधान अवताडे, अभिजीत पाटील, शिवसेना नेते अनिल सावंत, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही