Share

हवामान विभागाचा मोठा इशारा; पुण्यात पाणी शिरलं, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी किती धोक्याचे?

महाराष्ट्रात गेल्या ५ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने सातारा आणि पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय.

Published On: 

Maharashtra Rain Update showing flooded Bhide bridge and heavy rainfall in Pune.

अवघ्या ६ दिवसांत संपूर्ण महिन्याचा पाऊस (Maharashtra Rain Update) अंगावर कोसळला तर काय स्थिती होईल याचा थरार सध्या संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे. १ ते ६ जुलै या कालावधीत निसर्गाने असा काही जोर धरला की, जून महिन्याची संपूर्ण कसर एका झटक्यात भरून निघाली आहे.

हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असतानाच आता पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत कठीण असणार आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

Maharashtra Rain Update

नाशिकला ढगफुटीचा मोठा इशारा देण्यात आला होता आणि प्रशासनाची तयारीही सुरू होती, पण सुदैवाने ते ढग पालघर आणि गुजरातच्या दिशेने पुढे सरकले. त्यामुळे नाशिकचा धोका टळला असला तरी राज्याच्या इतर भागात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आजही काही जिल्ह्यांत शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पुण्यात मुसळधार (Pune Flood) पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली असून शहरातील प्रसिद्ध भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाणी वाढत असल्याने धरणातून तब्बल २७ हजार क्युसेकने मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय. यामुळे नदीकाठच्या एकता नगर सोसायटीमध्ये पाणी शिरले असून स्थानिक प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत.

दुसरीकडे, मुंबई आणि उपनगरात रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर आज सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. वरळी गावातील अनेक रस्ते रात्री पाण्याखाली गेले होते, पण सध्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत आहे. रेल्वे वाहतुकीवर मात्र थोडा परिणाम झाला असून मध्य रेल्वे ५ मिनिटे तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर लाईन १० मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी आज ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीदरम्यान समांतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यासोबतच रायगड, पालघर, कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या घाटमाथ्यावर तसेच विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हा मान्सून आता गुजरातसह अरबी समुद्र आणि राजस्थानच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तो हरियाणा, पंजाब व्यापून संपूर्ण देश व्यापून टाकेल, ज्यामुळे देशात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. राज्यावरील पावसाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही