Share

देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीवर मोठी घोषणा, पण अधिकृत घोषणेसाठी बळीराजाला वाट का पाहावी लागणार?

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. पण निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे अधिकृत घोषणा टळली असून शेतकऱ्यांना अटी व शर्तींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Published On: 

Maharashtra Farmer Loan Waiver state government cabinet meeting discussion

मुंबई – राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले की नेत्यांना अचानक शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कर्जमाफीची आठवण का येते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सध्या राज्यात अगदी असाच माहोल पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची जोरदार चर्चा सुरू झाली असून राजकारण चांगलंच तापलं आहे.

महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता. राज्यात सत्ता आल्यास कर्जमाफी करू, असे आश्वासन नेत्यांनी दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अगदी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पण विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने सरकारला थेट सूचना दिल्या आहेत.

निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की, तुम्ही घोषणा करू नका. त्यामुळे, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात चर्चा होईल, निर्णय होईल, निर्णयानुसार कारवाई होईल. मात्र, कुठलीही घोषणा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे.. येत्या दहा दिवसांच्या आत कर्जमाफीचा निर्णय मार्गी लागेल, असा दावा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला होता. नेत्यांच्या या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. खाजगी सावकारांचा तगादा वाढल्याने बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

याच वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी हा कर्जमाफीचा घाट घातला जात आहे. अनेक शेतकरी संघटनांनी या प्रश्नावरून सरकारवर थेट हल्लाबोल केला होता. सूत्रांनुसार सरकारवर सध्या मोठा दबाव आहे.

आता कर्जमाफीचा निर्णय होईल हे निश्चित असले तरी अटी आणि शर्ती काय असतील यावर प्रश्नचिन्ह आहे. नेमक्या किती शेतकऱ्यांना आणि कोणत्या निकषांवर या योजनेचा लाभ मिळणार, याबाबत अजून कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार हे नक्की.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install