Share

क्रिकेटचा ‘कणा’ निखळला; इंग्लंडची दादागिरी मोडीत काढणारा अन् वर्ल्डकप भारतात आणणारा ‘वाघ’ हरपला!

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारे, वर्ल्डकप इंग्लंडबाहेर आणणारे आणि दूरदर्शनची मक्तेदारी संपवणारे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजितसिंग बिंद्रा यांचे निधन झाले आहे.

Published On: 

Inderjit Singh Bindra Death: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष बिंद्रा कालवश; क्रिकेटने गमावला हिरा

🕒 1 min read

आज आपण आयपीएल आणि क्रिकेटचा जो झगमगाट बघतोय, त्याचा पाया नक्की कुणी रचला माहितीये? एका अशा माणसाने, ज्याने दूरदर्शनची मक्तेदारी संपवली आणि गोऱ्यांच्या देशातून वर्ल्डकप भारतात खेचून आणला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि क्रिकेट प्रशासनातील ‘भीष्मपितामह’ इंद्रजितसिंग बिंद्रा (Inderjit Singh Bindra) यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेटचा एक सुवर्ण अध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

१९७८ ते २०१४ अशी तब्बल ३६ वर्षे बिंद्रा यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनचं (PCA) एकहाती नेतृत्व केलं. मोहालीचं जे स्टेडियम आज जगातील सर्वोत्तम मानलं जातं, ते त्यांच्याच जिद्दीचं फळ आहे. तुम्हाला आठवत असेल, भारताने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला ज्या मोहालीच्या मैदानात लोळवलं, ते उभं करण्यात बिंद्रांचा सिंहाचा वाटा होता.

Inderjit Singh Bindra Death

८० च्या दशकापर्यंत क्रिकेटवर फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची हुकमत होती. वर्ल्डकप फक्त इंग्लंडमध्येच व्हायचा. पण बिंद्रा, एन.के.पी. साळवे आणि जगमोहन दालमिया या त्रिकुटाने ही ‘दादागिरी’ मोडीत काढली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच १९८७ मध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकप इंग्लंडबाहेर आयोजित करण्यात आला. आशियाई क्रिकेटची ताकद त्यांनी जगाला दाखवून दिली.

आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे, त्याचं श्रेय बिंद्रांच्या एका कायदेशीर लढाईला जातं. १९९४ मध्ये त्यांनी दूरदर्शनच्या मक्तेदारीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. हा खटला जिंकल्यामुळेच ESPN सारख्या खासगी कंपन्या भारतात आल्या आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने पैशांचा पाऊस पडू लागला.

१९८६ मध्ये भारत-पाक तणाव असताना पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल झिया उल हक यांना क्रिकेटच्या निमित्ताने भारतात बोलावण्याचा धाडसी सल्ला त्यांनीच दिला होता. जरी नंतरच्या काळात ललित मोदींना पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर काहीशी टीका झाली, तरी भारतीय क्रिकेटला ‘ग्लोबल पॉवर’ बनवण्यात बिंद्रांचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!